कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विनावेतन एक तास काम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

चंद्रपूर, ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी (ता. 23) प्रहार संघटनेच्या नेतृत्वात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विनावेतन एक तास काम केले. एक दिवसाच्या कामाचा मोबदला शासनला प्रतीकात्मक स्वरूपात दान करण्यात येणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. प्रहारचे जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दुपारी दोन वाजता या आंदोलनाची सुरुवात झाली. सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत काम करणारे कर्मचारी कामावरून सुटी झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशदारापाशी एकत्रित झाले. मागण्यांना घेऊन त्यांना नारेबाजी केली. त्यानंतर सर्व कर्मचारी परत आपल्या कामावर गेले. त्यांनी विनावेतन एक तास अतिरिक्त काम केले.
या वेळी प्रहार कामगार संघटनेचे सतीश खोब्रागडे, राहुल दडमल, कांचन चिंचेकर, सतीश येसांबरे, अमोल घोनमोडे, सतीश घोनमोडे, सागर हजारे, कल्पना ताडाम, ज्योती ढोलणे, छाया कोखारे, माया वांढरे, आरती गाडीवाल, बबीता लोडल्लीवार, भाग्यश्री मुधोळकर, सुनयना क्षीरसागर यांच्यासह कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, दर महिन्याला नियमित व नियमानुसार वेतन देण्यात यावे, नियमानुसार भत्ते व सुट्या देण्यात याव्यात, कंत्राटी कर्मचारी कामगार यांच्याशी अपमानजनक भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, चुकीचे आरोप लावून कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याचे प्रकार बंद करण्यात यावे, अशा मागण्या आहेत.

Web Title: worker problem