कामगार आयुक्त कार्यालयावर मजुरांची धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

चंद्रपूर  : घरकुलासह अन्य योजनांचा लाभ देण्यात यावा, या मागणीला घेऊन शुक्रवारी (ता. 26) आयटकच्या नेतृत्वात बांधकाम मजुरांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक दिली. या मागण्या तातडीने न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयटकने दिला.

चंद्रपूर  : घरकुलासह अन्य योजनांचा लाभ देण्यात यावा, या मागणीला घेऊन शुक्रवारी (ता. 26) आयटकच्या नेतृत्वात बांधकाम मजुरांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक दिली. या मागण्या तातडीने न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयटकने दिला.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरकुल मंजूर करावे, नोंदणीकृत कामगारांना अर्ज दिल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत अवजारे घेण्याकरिता पाच हजार रुपये देण्यात यावे, अत्यावश्‍यक संच व सुरक्षासंचाचे वाटप तालुकास्तरावर करण्यात यावे, तालुकास्तरावर स्वतंत्र नोंदणी कॅम्प घेण्यात यावा, 60 वर्षावरील बांधकाम मजुरांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्यावे, तसा कायदा करावा, नव्याने नोंदणी करताना जाचक अटी लादण्यात येऊ नये, शेतमजूर, कामगारांचा त्यात समावेश करावा, बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नाकरिता पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे या मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व विनोद झोडगे, संतोष दास, प्रा. नामदेव कन्नाके, डॉ. महेश कोपुलवार, नामदेव नखाते, राजू गयनेवार, प्रकाश रेड्डी, गव्हारे, श्रीधर वाढई, कुंदा कोहपरे, भगवान आसुटकर, डॉ. महेश रेड्डी, मनोज घोडमारे, जागेश्‍वर मुलमुले, धनराज खोब्रागडे, संभाजी रायवाड, अजय रेड्डी, दिलीप दुर्गावार यांनी केले. मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त लोया यांना देण्यात आले.
शेकडो कामगार वंचित
राज्य सरकारने 2015 मध्ये बांधकाम क्षेत्रातील मजुरांना घरकुल देण्याची घोषणा केली. ग्रामीण भागात घरकुलासाठी दोन लाख, तर शहरी भागासाठी चार लाख 50 हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, जिल्ह्यात नोंदणीकृत कामगारांना अजूनपर्यंत घरकुल मिळाले नाही. त्यांचे अर्जही स्वीकारण्यात येत नाही.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers clash at the Labor Commissioner's Office