टॅंकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर): कामावरून दुचाकीने परतत असताना टॅंकरच्या जोरदार धडकेने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबतचा एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-भंडारा महामार्गावरील मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा येथील ईरिगेशन कॉलनीच्या जवळच सोमवारी (ता. 12) रात्री साडेआठला घडली.

मृताचे नाव विशाल देवगीर गिरी (वय 24) असे असून मौदा तालुक्‍यातील धानोली गावातील रहिवासी होता. जखमी युवक हासुद्धा मौदा तालुक्‍यातील हिंगणा गावाचा रहिवासी आहे. दोघेही हल्दीराम कंपनीतून कामावरून सुटी झाल्यावर गुमथळा येथील किरायाने राहात असलेल्या घरी येत होते. अगदी घराजवळच आल्यावर पाण्याचा टॅंकर मागावून भरधाव आला. दोघेही दुचाकीने येत असताना त्यांच्यात जोरदार धडक झाली. यात विशाल गिरी या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुसरा पंकज गंगाराम वाघमारे (वय 25) हा गंभीर जखमी झाला. दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा येथे नेले असता विशालला मृत घोषित केले. पंकजवर प्राथमिक उपचार करून मेडीकल रुग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले. जखमी युवकास त्वरित नागपूर येथील मेडीकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात होताच टॅंकरचालकाने घटनास्थवरून टॅंकरसह पळ काढला. त्या टॅंकरला मुरलीधर वाघ यांच्या शेतातून परत आणण्यात आले. मात्र, चालक पळाल्याने जनतेच्या हातात सापडला नाही. ही दुर्घटना घडताच नागरिकांचा क्रोध अनावर झाला. हल्दीराम कंपनीच्या टॅंकरला गावातून पाणी नेण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker's death in tanker collision