कामठीत कॉंग्रेस, भाजप सक्षम उमेदवारांच्या शोधात

file photo
file photo

कामठी (जि.नागपूर) : जिल्हा परिषदेअंतर्गत कामठी तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. यात कोराडी, येरखेडा, गुमथळा व वडोदा या सर्कलचा समावेश होतो. यामध्ये कोराडी व येरखेडा सर्वसाधारण, गुमथळा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर वडोदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे.

नवीन सर्कलची भर
कामठी पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. यामध्ये कोराडी, कवठा, येरखेडा, भिलगाव, गुमथळा, महालगाव, वडोदा व बिडगाव या गणांचा समावेश आहे. पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी यात आठपैकी चार गण महिलांसाठी राखीव आहेत. यातील येरखेडा, भिलगाव, वडोदा सर्वसाधारण तर कोराडी व गुमथळा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. बिडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तर महालगाव नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे. तसेच कवठा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. यातील तीन सर्कलची नव्याने रचना करण्यात आली असून या जि. प. सर्कलपैकी महादुला नगरपंचायत झाल्याने या सर्कलचा काही भाग कोराडी सर्कलमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर पूर्वीच्या कोराडी व गुमथळा सर्कलमधील काही गावे वगळून येरखेडा हे नवीन सर्कल तयार करण्यात आले.

बावनकुळे, सुरेश भोयर यांच्यातील चढाओढ
कोराडी हे माजी मंत्री बावनकुळे तर येरखेडा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांचे गृहग्राम आहे. कोराडी जि. प. सर्कलमधून कॉंग्रेसतर्फे महादुला जि. प. सर्कलचे विद्यमान जि. प. सदस्य नाना कंभाले यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी बिना येथील माजी सरपंच वामन भडंग, लीलाधर भोयर, किशोर धांडे हेसुद्धा उमेदवारीकरिता प्रयत्न करीत आहेत. भाजपतर्फे अरविंद खोबे, मदन राजूरकर, संजय मैंद, खसाळ्याचे सरपंच रवी पारधी, खैरीचे सरपंच बंडू कापसेंसह माजी सरपंच नत्थू रघटाटे उमेदवारी मिळविण्याकरिता प्रयत्न करीत असले तरी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे व मुलगा संकल्प बावनकुळे यांचीही नावे चर्चेत आहेत.

सहानुभूतीची लहर
येरखेडा जि. प. सर्कलमधून कॉंग्रेसफर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांचे पुत्र अनुराग भोयर, माजी आमदार देवराव रडके यांचे पुत्र डॉ. विजय रडके, माजी ग्रा.पं. सदस्य अमित भोयर, विद्यमान जि.प. सदस्य सरिताताई रंगारी व कुंदा देवराव आमधरे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपतर्फे येरखेड्याचे माजी सरपंच मोहन माकडे, पंकज साबळे, पं. स. विद्यमान उपसभापती देवेंद्र (बाळू) गवते, उन्मेश महल्ले यांच्यासह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले येरखेड्याचे माजी ग्रा. पं. सरपंच मनीष कारामोरे यांचे नाव चर्चेत असले तरी मागील आठवड्यात अपघाती निधन झालेले भाजपचे युवा कार्यकर्ते अरुण पोटभरे यांच्या पत्नी रूपाली अरूण पोटभरे यांचा सहानुभूतीची लहर म्हणून विचार करू शकतो.

उमेदवारीसाठी चढाओढ
गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधून कॉंग्रेसतर्फे अनंत वाघ, दिनेश ढोले, ज्योती झोड, नाना वाघ, मनोज कुथे यांची नावे चर्चेत असून भाजपतर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी माजी जि.प. सदस्य राजकुमार घुले, लिहीगावचे सरपंच गणेश झोड, पं. स. चे माजी सभापती सेवकराम उईके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आजनीचे उपसरपंच उमेश रडके यांची नावे चर्चेत आहेत. वडोदा जि. प. सर्कलमधून कॉंग्रेसतर्फे तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी माजी जि. प. सदस्य रेखा राघोर्ते, लता मनोहर आखरे, नीता मंडलिक हेसुद्धा उमेदवारी मिळविण्याकरिता प्रयत्नरत आहेत. तर भाजपतर्फे पंचायत समितीचे विद्यमान सभापती अनिता रमेश चिकटे यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी माजी पंचायत समिती सभापती रामकृष्ण वंजारी हे आपल्या पत्नीकरिता उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com