कॅशलेससाठी तिरोड्यात कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

तिरोडा - नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर दिला. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे अदानी प्रकल्पाच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कॅशलेस व्यवहारासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करून त्यासाठी लागणारी मदत करण्याकरिता अदानी प्रकल्प समूहाने पुढाकार घेतला आहे. 

कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक दीपक नंदेश्‍वर, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी. पी. शाहू, उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, न. प.चे मुख्याधिकारी उरकुडे उपस्थित होते. कॅशलेस व्यवहाराला बळ द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. त्यातच व्यवस्थापक नंदेश्‍वर यांनी बॅंकेकडून कॅशलेस व्यवहारासाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा  आणि इतर माहिती दिली. उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी महसूल विभागाशी संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी म्हणजेच रेशन दुकानदारांनी कॅशलेसच अर्थ व्यवहार करावे, असे निर्देश दिले. याकरिता प्रत्येक दुकानदारांनी स्क्रॅप मशीनची व्यवस्था करावी, असेही त्यांनी आवाहन केले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी उरकुडे यांनीसुद्धा कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्याचे आवाहन  केले. विशेष म्हणजे, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी. पी. शाहू यांनी कॅशलेस व्यवहारामध्ये  येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी अदानी समूह नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. कार्यशाळेत प्रामुख्याने मोहन ग्यानचंदानी, चिखलोंढे, मिर्झा, सुनील बारापात्रे, किशोर वत्यानी, पंकज मेहरचंदानी, सागर ग्यानचंदानी, गजानन बारापात्रे, शोभेलाल दहीकर, राजा मेहरचंदानी व रेशन दुकानदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: workshop in tiroda for cashless