दहशतवादाची मोठी किंमत वऱ्हाडने चुकविली! 

विवेक मेतकर 
मंगळवार, 21 मे 2019

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड या दोन जवानाचा समावेश होता.

अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. दहशतवादी कारवाई करताना वऱ्हाडातील अनेक जवानांनी प्राणांची आहूती दिली असून, त्यांच्या कुटुंबियांची परवड होत असल्याचे दिसून येत आहे. 

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड या दोन जवानाचा समावेश होता. या घटनेनंतर शहिद कुटुंबियांचे सांत्वन करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या भेटी. दिलेली तुटपुंजी आश्वासने याव्यतीरिक्त पुढे काहीच झाले नाही. मात्र, दहशतवादाशी दोन हात करणाऱ्या या शहिदांच्या कुटुंबियांची आजही परवड होत आहे. 

अकोला जिल्ह्यात १४ जवान हुतात्मा 
१९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान हुतात्मा झाले. त्यामध्ये महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, आर्टिलरी रेजिमेंटमधील जवानांचा समावेश आहे. १९६५ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध मोहिमेसह आॅपरेशन मेघदूत व आॅपरेशन रक्षक अशा वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत जिल्ह्यातील १४ जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले. १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये दुर्योधन झाबुजी सिरसाट, महादेव नामदेव तायडे, प्रल्हाद भोलाजी साव, आनंद सकाराम काळपांडे, हरिश्चंद्र पंढरी वानखडे, संतोष खुशाल जामनिक, भास्कर श्रीराम पातोंड, विजय बापूराव तायडे, विनोद यशवंत मोहोड, कैलाश काशीराम निमकंडे, प्रशांत प्रल्हाद राऊत, संजय सुरेश खंडारे, आनंद शत्रुघ्न गवई व सुमेध वामनराव गवई या हुतात्मा जवानांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world anti terrorist day in akola