जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : येणारा काळ संशोधनाचा असून, रसायनशास्त्रातील संशोधन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने देशाला अनेक संशोधक आणि अभियंता दिले असून संस्थेत जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर : येणारा काळ संशोधनाचा असून, रसायनशास्त्रातील संशोधन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने देशाला अनेक संशोधक आणि अभियंता दिले असून संस्थेत जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एलआयटीतील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे (एलआयटीए) एलआयटी परिसरात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याच्या उद्‌घाटनाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक डॉ. राजू मानकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, ऑसम प्रॉडक्‍ट्‌सचे लोकसारंग हरदास, एलआयटीएचे अध्यक्ष डॉ. अजय देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. महेशकुमार येन्की, सचिव अमरिश पुरोहित उपस्थित होते. गडकरी म्हणाले, एलआयटीच्या विद्यार्थ्यांनी देशात नव्हे, तर विदेशात नाव केले. त्यांचे योगदान देशाच्या विकासात अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे त्यांचा ज्ञानाचा फायदा संशोधनातही तेवढाच महत्त्वाचा आहे. एलआयटीतील विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न करावा. सरकारच्या बऱ्याच मर्यादा असल्याने माजी विद्यार्थ्यांनी आपला ऋणानुबंध म्हणून एलआयटीला भरघोस मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशी सर्वच माजी विद्यार्थ्यांची भावना आहे. त्यासाठी हवी ती मदत करणार असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी देश आणि विदेशात एलआयटीचा नावलौकिक उंचावणारे कमल नारायण सिथा, डॉ. जीवनप्रकाश गुप्ता, हरीश भीमानी, श्‍याम बंग, दिलीप गौर, विनायक मराठे, सुधीर श्रीवास्तव, डॉ. उज्ज्वला दिवेकर, अरुणकुमार श्रीवास्तव या नवरत्नांचा स्मृतिचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच एलआयटीच्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी मधुकर पाटील आणि डी. लक्ष्मीनारायण यांच्या सुश्रा कुमुदताई कामठीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी "एलआयटीए संवाद' स्मरणिकेचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: World-class research news