Nurses Day : रुग्णांच्या वेदनेवर ‘त्यांची’ मायेची फुंकर 

World Nurse Day Special Report of Akola
World Nurse Day Special Report of Akola

अकोला : रुग्णसेवा आणि नर्सेस हे नाते फार जुने आहे ! मात्र बदलत्या काळानुसार नर्सेसना भेडसावणाऱ्या समस्यांत वाढ झाली असली तरी; आजही शेकडो नर्सेस विनातक्रार रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालताना दिसून येत आहे. 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेपचार रुग्णालयात 1200 परिचारिकांची आवश्यकता आहे. शासन निर्णयानुसार तीन रुग्णांच्या मागे एक परिचारिका असणे आवश्यक आहे. मात्र हा आकडा 350 इतकाच आहेत. यामुळे परिचारिकांना दैनंदिन कर्तव्य बजावताना मोठी कसरत करावी लागते. तर जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये सुमारे 5 हजार परिचारिका या रुग्णांना सेवा देत आहेत. बदलत्या काळानुसार या नर्सेसना भेडसावणाऱ्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावे लागत आहे. नर्सेसना अद्याप कायद्याचे संरक्षण नाही. शिवाय कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कपांऊंडर, कधी कधी रुग्णांकडूनही शारिरीक, मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

याशिवाय ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूति, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जातो. रुग्णांना जर योग्य सेवा द्यायची असेल तर आज ही स्थिती बदलणे गरजेचे आहे. समाजात परिचारिकांना योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे. या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट होऊ शकेल, असे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्य, सर्वाेपचार रुग्णालयाच्या परिचारिका प्रियंका जाधव यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

सुखापेक्षा दुःखाचीच झालर अधिक -
अनेक खेड्यापाड्यात वाड्या, वस्त्या, तांड्यामध्ये आरोग्य सेवेचा मोठा अभाव दिसून येतो. नजीकच्या मेळघाटाचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. रुग्णसेवा सातत्याने प्रभावित होत असताना अशा स्थितीत परिचारिका आपले कर्तव्य ठामपणे बजावताना दिसून येतात. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दुःखाची झालर अधिक आहे. असे असतानाही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चे दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर परिचारिका घालत आहेत. 

आज अनेक रुग्णालयांमध्ये उत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम नर्सेसकडून केले जाते. मात्र त्यांना अजूनही योग्य मानधन मिळत नाही. शिवाय नर्सेसना कायद्याचेही संरक्षण नसल्याने त्यांची सुरक्षितता नाही. रिक्त पदांचा प्रश्न आहे. तो सुद्धा सरकारने सोडवून परिचारिकांना दिलासा द्यायला हवा. 
-ग्रेसी मायकल, अधिसेविका, जीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com