चिंतादायी! दरवर्षी एक लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा विळखा 

file photo
file photo

नागपूर : आनुवंशिकतेने ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एकूण ब्रेस्ट कॅन्सरच्या तुलनेत कमी आहे. परंतु, एकूण कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये 30 टक्के ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण आहे. शहरात दर 30 तर ग्रामीण भागात 60 महिलांमध्ये एका महिलेस ब्रेस्ट कॅन्सर आढळतो. दरवर्षी भारतात एक लाख महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यात सापडत असून, दरवर्षी यात दोन टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. ही गंभीर बाब असून, कॅन्सरग्रस्त महिलांना जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलतर्फे कॅन्सरची जागृती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रसन्ना जोशी यांनी गुरुवारी दिली. 
महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती, निदान आणि उपचारासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे निधी मिळाला आहे. या निधीतून "कॅन्सर जागृती मोबाईल व्हॅन' तयार केली आहे. या व्हॅनतर्फे 15 ऑक्‍टोबरला "कॅन्सर स्क्रिनिंग'चे पहिले शिबिर होणार आहे. यानिमित्त डॉ. जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 50 टक्के महिला या 50 वर्षे व त्यापेक्षा कमी वयोगटातील असतात. 20 टक्के महिला या 35 वर्षांपेक्षा कमी असतात. तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये 70 टक्के महिला येतात. यामुळे त्यांचे जगणे कठीण होते आणि ब्रेस्ट कॅन्सरचा मृत्युदर वाढतो. शून्य अवधीत ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यास रुग्णाला सामान्य जीवन जगता येत असल्याचा दावा डॉ. जोशी यांनी केला.

उपराजधानीत 39 टक्के महिलांना धोका 
नागपुरात 39 टक्के महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यामुळे ऑक्‍टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचा महिना असल्याने जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कमी वयात अर्थात वेळेत लग्न होणे. बाळाला होणारे स्तनपान व्यवस्थित तसेच अधिक काळ सुरू ठेवणे. उशिरा लग्न, उशिरा बाळ आणि बाळाला दूध न पाजणे हे धोकादायक ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com