कुंपणाच्या आत वनविभागाची मुक्त चराई

नीलेश झाडे 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

> रोपवन सुरक्षा कुंपणात भ्रष्टाचार 
> वन्यजिवांचा जीवालाच धोका 
> वन्यजीव अभ्यासकांनी वनविभागावर ओढले ताशेरे 
> वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संबंधित ठेकेदाराशी अर्थपूर्ण संबंध 

धाबा (जि. चंद्रपूर) : रोपवनातील वृक्षांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून रोपवनाच्या सभोवताल लोखंडी जाळीचे कुंपण उभे केले जात आहे. कुपंण उभे करण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, जाळी लावण्याच्या आधीच उभे केलेले सिमेंटचे खांब कोसळले आहेत. कुंपणामुळे वन्यजिवांचा जीवालाच धोका असल्याचे सांगत वन्यजीव अभ्यासकांनी वनविभागावर ताशेरे ओढले आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून रोपवणाच्या सभोवताल लोखंडी जाळीचे कुंपण उभे केले जात आहे. जिल्ह्यात 120 कुंपणाचा कामाला वनविभागाने मंजुरी दिलेली आहे. त्यातील जवळपास 50 ते 60 कुंपणाचे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित बांधकाम वनक्षेत्रात सुरू आहे. मात्र, सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. पाच इंच खड्डा खोदून सिमेंट खांब उभे केले जात आहेत.

जाळी लावण्याचा आधीच अनेक सिमेंट खांब कोलमडून पडले आहेत. सिमेंट खांबाचा दर्जा निकृष्ट असल्याने अनेक खांब अर्ध्यातूनच मोडून पडले आहेत. याबाबत तक्रार करूनही वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. वनविभागाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संबंधित ठेकेदाराशी अर्थपूर्ण संबंध असल्याने वनविभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला जात आहे. 

Image may contain: plant and outdoor

लाखोंचे काम हजारात! 
रोपवण क्षेत्रानुसार सुरक्षा कुंपणाचा निधी आखण्यात आला आहे. वीस लाख ते तीस लाख रुपये खर्चून कुंपण उभे केले जात आहे. जवळपास पाच वर्षे कुंपण गुराढोरांपासून सुरक्षा करेल असे गृहीत धरण्यात आले आहे. मात्र, कुंपणाचे बांधकाम होऊन दोन महिणे लोटले असतानाच गोंडपिपरी तालुक्‍यातील कुंपणे कोसळली आहेत. कुंपणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने लाखोंचे काम हजारात गुंडाळले आहे. दर्जाहीन झालेल्या बांधकामाकडे मात्र वनविभाग डोळेझाक करीत आहे. 

वन्यप्रेमी नाराज 
वनविभागाचे रोपवण जंगलाच्या मध्यभागी सुरु आहे. अनेक हेक्‍टरमध्ये रोपवण उभे केले जात आहे. गुराढोरांपासून रोपांचा सुरक्षेसाठी उभे करण्यात येणारे कुंपण वन्य जिवांसाठी जीवघेणे ठरते आहे. कुंपणाच्या लोंखडी तारेच्या जाळीत अडकून वन्यजीवांचा मृत्यू होऊ शकतो आशी भीती वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

Image may contain: outdoor and nature
पडलेले खांब

भ्रमणमार्गातच अनेक रोपवणे 
विशेष म्हणजे वन्य जिवांचा भ्रमणमार्गातच अनेक रोपवणे आली आहेत. काही रोपवनाचा आत लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले खोदतळे आले आहे आहेत. वन्य जिवांना तृष्णा भागविण्यासाठी कुंपण ओलाडूंन जावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worst construction of forest department