रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता,नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

कुरखेडा ते पुराडा या मार्गावरील लेंडारी ते पुराडा मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम दर वेळेस करण्यात येते, आणिप्रत्येकवेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात.

रामगड (जि. गडचिरोली) : नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. कुरखेडा ते पुराडा या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कुरखेडा ते पुराडा या मार्गावरील लेंडारी ते पुराडा मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम दर वेळेस करण्यात येते, आणिप्रत्येकवेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात.

या मार्गावरून आंतरराज्यीय वाहतूक होते. छत्तीसगड राज्यातून जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात असतात. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात आणि गढ्ढे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्‍यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे.

जड वाहतूक दिवस रात्र सुरू राहिल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे. लेंडारी नाल्याच्या उंच पुलाचे बांधकाम कंत्राटदारांनी तीन वर्षांपूर्वी केले होते. परंतु तीन वर्षांमध्येच खड्डे पडून या पुलातील लोखंडाच्या सळाखी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या पुलावरून जाताना दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या पुलाची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ

पावसाळ्यात परिस्थिती बिकट...
आता मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. खरेतर या रस्त्यातील खड्डे बुजवून नव्याने डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच करणे अपेक्षित होते. पण, संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worst road in Gadchiroli district