सोनिया गांधी तयार नसतील तर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासाठी समोर यावे, का आहे या वक्तव्याला महत्त्व, वाचा

क्रिष्णा लोखंडे
Monday, 24 August 2020

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर पक्षाअंतर्गत दोन गट पडले आहे. गांधी कुटुंबांव्यतिरिक्त इतरांना या पदावार संधी मिळावी, असा एक मतप्रवाह आहे. तर गांधी कुटुंबच पक्षाला आधार ठरू शकते, या कुटुंबाला बलीदानाची परंपरा आहे, त्यांना देशात मानणारा मोठा वर्ग आहे, असा दुसरा मतप्रवाह आहे.

अमरावती : सोनिया गांधी तयार नसतील तर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासाठी समोर यावे, असे मत व्यक्त करीत राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचे नाव सूचवले आहे. त्या राहुल ब्रिगेडच्या म्हणून परिचित असल्याने व काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारी अध्यक्ष असल्याने त्यांच्या मताला विशेष महत्त्व आहे. आपले मत त्यांनी ट्विटवरून व्यक्त केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाहून पक्षाअंतर्गत मतभेद उफाळून आले असतानाच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून राहुल गांधींचे नाव अध्यक्षपदासाठी सूचविले आहे. गांधी इज नॉट अ फॅमिली, इट्स डीएनए ऑफ इंडिया, इफ सोनियाजी हॅज मेड अप हर माइंड देन राहुलजी शूड लीड द पार्टी, इंडिया निड्स राहुलजी, अशा शब्दात त्यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्या नावाचे अध्यक्षपदासाठी जोरदार समर्थन केले आहे.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

विद्यमान स्थितीत सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत तर राहुल गांधी यांनी पुन्हा या पदावर आरूढ होण्यास नकार दिला आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत अद्याप पर्याय समोर आला नसतानाच सोनिया गांधी मात्र आपल्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर पक्षाअंतर्गत दोन गट पडले आहे. गांधी कुटुंबांव्यतिरिक्त इतरांना या पदावार संधी मिळावी, असा एक मतप्रवाह आहे. तर गांधी कुटुंबच पक्षाला आधार ठरू शकते, या कुटुंबाला बलीदानाची परंपरा आहे, त्यांना देशात मानणारा मोठा वर्ग आहे, असा दुसरा मतप्रवाह आहे.

ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया

दुसऱ्या मतप्रवाहाच्या नेत्यांना कुटुंबातीलच व्यक्ती अध्यक्षपदी हवा असून यशोमती ठाकूर या नेमक्या या मतप्रवाहातील आहेत. त्या राहुल ब्रिगेडच्या सदस्य म्हणूनही परिचित आहेत. यशोमतींच्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

उघडून तर बघा - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'

सर्वांचे लक्ष निर्णयाकडे

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक सुरू झाली असून, सोनिया गांधी यांनी मी अंतरिम अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आता पक्षाध्यक्षपद सोडायचे आहे, अशी माहिती सोनिया गांधी यांनी नेत्यांना दिल्याने त्यांनी राजीनामा देण्याची तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट आहे. यामुळे काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत नेमके काय निर्णय होते. पुन्हा कमान गांधी कुटुंबांकडेच कायम राहील का किंवा इतर कुणाला संधी मिळेल, याकडे लक्ष वेधले गेले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yashomati thakur says Rahul gandhi your country needs you