esakal | Gram Panchayat Result : यवतमाळमध्ये ११० ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; आघाडी, भाजपचा समसमान वाटा
sakal

बोलून बातमी शोधा

yavatamal 925 gram panchayat election result update

जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी नऊ वाजतापासून तालुकास्तरावर सुरू झाली आहे.  16 तालुक्यात 15 टेबलांवर मतमोजणी सुरू आहे.

Gram Panchayat Result : यवतमाळमध्ये ११० ग्रामपंचायतींचे निकाल घोषित; आघाडी, भाजपचा समसमान वाटा

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींमधील आठ हजार 101 जागांसाठी सोमवार (ता.18) सकाळी नऊ वाजतापासून सुरुवात झाली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार, 110 ग्रामपंचायतींचे निकाल घोषीत झाले आहेत. यवतमाळ तालुक्यातील बहूतांश भागात भाजपची सरशी दिसून येत आहे. इतर ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला दिसत आहे. अनुचितप्रकार घडू नये,यासाठी संवेदनशील गावात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी नऊ वाजतापासून तालुकास्तरावर सुरू झाली आहे.  16 तालुक्यात 15 टेबलांवर मतमोजणी सुरू आहे. संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार फेरींची संख्या निश्‍चित करण्यात आलेली आहे. साधारणतः 15 फेरी प्रत्येक तालुक्यात होणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. यात त्या भागातील गटानुसार सर्वच पक्षाला समिश्र कौल मतदारांनी दिला आहे. यवतमाळ तालुक्यात भाजपचे निवडून येणार्‍या सदस्यांची संख्या जास्त आहे. दारव्हा-नेर-दिग्रस तालुक्यात शिवसेनेला सर्वाधीक कौल मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पहायला मिळाली. आघाडीचा झेंडा बहूतांश ग्रामपंचायतीवर फडकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आठ हजार जागांसाठी तब्बल 17 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या संख्या -

 • यवतमाळ-67
 • बाभूळगाव-55
 • आर्णी-66
 • नेर-50
 • दारव्हा-76
 • दिग्रस-48
 • पुसद-105
 • महागाव-73
 • उमरखेड-85
 • घाटंजी-50
 • केळापूर-45
 • झरी जामणी-41
 • वणी-82
 • मारेगाव-31
 • कळंब-59
 • राळेगाव-47