आता रात्री ७ नव्हे तर सकाळी ११च्या आत घरात; नवे नियम १५ मेपर्यंत

आता रात्री ७ नव्हे तर सकाळी ११च्या आत घरात; नवे नियम १५ मेपर्यंत

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण (Coronary infection) अनियंत्रित झालेले आहे. वाढलेला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने आणखी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. औषधांची दुकाने वगळता अत्यावश्‍यक सेवेत येणारे किराणा, भाजीपाला, डेअरी, चिकन, मटण मासे विक्रीच्याने दुकानांच्या वेळा सकाळी अकरापर्यंतच करण्यात आलेल्या आहेत. नवे सुधारित आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी काढले आहेत. ९ ते १५ मेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. पहिल्या दिवशी अकरानंतर शहरातील गजबजलेले रस्ते सामसूम झाले होते. (Yavatmal begins implementation of strict restrictions)

राज्य सरकारने ‘ब्रेक द चैन’अंतर्गत नवीन नियमावली लागू केलेली आहे. १५ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यानंतरही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळेच आता जिल्हा प्रशासनाने रविवारपासून १५ मेपर्यंत निर्बंध आणखी कडक केलेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कृषी केंद्रांच्या वेळा दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या होत्या.

आता रात्री ७ नव्हे तर सकाळी ११च्या आत घरात; नवे नियम १५ मेपर्यंत
आली कशी ही वेळ! शेतकरी नेत्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर

मात्र, नवी नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली असून, निर्बंध आणखीन कडक केले आहेत. त्यामुळे आता रुग्णालये व औषधी दुकाने वगळता अत्यावश्‍यक सेवेत येणारे सर्व दुकांनाच्या वेळा ११ वाजेपर्यंतच केल्या आहेत. परिणामी आता नागरिकांना अकरानंतर अत्यावश्‍यक कारणांशिवाय रस्त्यावर फिरता येणार नाही. पहिल्याच दिवशी प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे शहरातील रस्ते सामसूम झाले होते. सर्वत्र शुकशुकाट होता.

१५ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. सरकारी कार्यालये १५ मेपर्यंत बंद असणार आहेत. लग्नसमारंभ घरातच करावा लागणार आहे. लग्नसमारंभासाठी २५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. विनाकारण भ्रमंती करणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

(Yavatmal begins implementation of strict restrictions)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com