चांगल्या रस्त्यांची लावली वाट; व्यापाऱ्यांसह नागरिक त्रस्त

yavatmal corporation made roads damaged
yavatmal corporation made roads damaged

यवतमाळ : शहरात गेल्या काही वर्षांत अमृत योजनेची जलवाहिनी टाकताना कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळेच शहरातील रस्त्यांची 'वाट' लागली आहे. सध्या दत्त चौकात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वीच झालेला सिमेंट क्राँक्रीटचा रस्ता फोडण्यात येत आहे. सततच्या या रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त झालेले असून, व्यापाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी अमृत योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणले जात आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय भूमिगत गटार योजनेसाठीही कामे केली जात आहेत. ही दोन्ही कामे करताना नियोजन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना दोन वर्षांपासून खोदलेल्या नालीतून प्रवास करावा लागत आहे. अनेक प्रभागांत नवीन रस्ते करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांत जलवाहिनी व भूमिगत गटार योजनेसाठी हे रस्ते खोदण्यात आलेत. 

परिणामी, रस्ता 'जैसे थे' झाला. तशीच स्थिती स्थानिक दत्त चौकात दिसत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून दत्त चौकात सिमेंट क्राँक्रिटचा मजबूत रस्ता तयार करण्यात आला. रस्ता बांधकाम करून वर्षही झाले नाही. असे असताना जलवाहिनीसाठी रस्ता खोदला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जीवन प्राधिकरण व नगरपालिकेचा समन्वय नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पैशांचा अपव्यय सुरू आहेच. याशिवाय नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com