esakal | कोरोना जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर; मास्क वापरण्याची विनंती; जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmal district collector are on road to tell people importance of mask

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यवतमाळ शहरासह, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्ण संख्येचा आलेख वाढता आहे

कोरोना जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर; मास्क वापरण्याची विनंती; जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.19)मध्यरात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. त्यापुर्वी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन, यवतमाकर मास्क लावतात की नाही त्याची पाहणी केली. स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्‍यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना दंड ठोठावला.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यवतमाळ शहरासह, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्ण संख्येचा आलेख वाढता आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून संचारबंदीच्या आदेशाची अमंलबजावणी सुरु होणार आहे. 

हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जाणून घ्या नियम 

त्यापुर्वी जिल्हाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला. विना मास्क फिरणार्‍या नागरिकांना मास्क लावण्याची विनंती करीत दंड ठोठावला. कोरोना कमी करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझर चा वापर अत्यंत आवश्यक आहे. अनेक ठिक़ाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसत आहे. बाजारापेठेत सर्रासपणे नागरिकांचा विनामास्कचा वावर सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वत: ऑनफिल्ड उतरले आहे. 

जिल्हाधिकार्‍यांनी बसस्थानक चौकात आकस्मिक भेट दिली. जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू होणार असल्याने आता बाजारपेठेची वेळ रात्री आठपर्यंत करण्यात आली आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र येण्यावर बंदी आहे. 

हेही वाचा - आता याला काय म्हणावं! मयतीला आले अन् चोरी करून गेले; पाहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल

धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेह सम्मेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका आदीकरीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. कारवाई करताना तहसीलदार कुणाल झाल्टे, पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, डॉ. विजय अग्रवाल यांचेसह पालिका कर्मचारी पथक,पोलीस पथक, कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image