यवतमाळ जिल्ह्यात आणखी सव्वादोन लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील पिंपळखुटी येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्‍याजवळ एसएसटीच्या पथकाने चारचाकी वाहनातून संशयास्पदरीत्या नेण्यात येत असलेली 2 लाख 30 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई आज, सोमवारी करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर होताच पैशांची हेराफेरी रोखण्यासाठी निवडणूक विभागाने चार ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन केली आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्‍यावरून तस्करीला विशेष वाव आहे. आज, सोमवारी पिंपळखुटी येथील एसएसटी पथकाने चारचाकी वाहनांची तपासणी केली असता, एका वाहनात त्यांना रोख रक्कम आढळून आली. गाडीचा मालक कोपूल व्यंकटरामन्ना स्वतः गाडी चालवत होता. तर मागे बसलेल्या त्याच्या दोन सहकाऱ्यांपैकी नरेश गुरुवाया याच्याजवळ 2 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
याबाबत अधिक विचारणा केली असता नागपूर येथून साग कटसाइज आणि फर्निचर साहित्य विकत घेण्यासाठी ही रक्कम नेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या रकमेची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याजवळ नसल्यामुळे पथकाने ही रक्कम जप्त केली आहे. गेल्या सहा दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 51 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal district seizes lakho rupees