आईपासून एक दुरावला, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील डोंगराळ भागात वसलेल्या वाकान शिवारात एक बिबट मादी दोन बछड्यांसह दिसली. तिने एका बछड्याला नेले; तर दुसऱ्याची तिच्यापासून ताटातूट झाली. दुरावलेला वनअधिकाऱ्यांच्या तर ताब्यात आहे; मात्र आईने नेलेल्या बछड्याचा मृतदेह आढळून आला.

वाकान येथील गणेश चव्हाण यांच्या शेतात ही मादी बिबट बछड्यांसह दिसली होती. तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या गडबडीत तिचा एक बछडा तेथेच राहिला व एकालाच ती घेऊन जाऊ शकली. ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे एसीएफ बी. के. कऱ्हे, वनपरिक्षेत्राधिकारी एस. एस. पवार, वन परिमंडळ अधिकारी एस. एस. जोग तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने बछड्यास पकडले. आईपासून दुरावलेला हा बछडा चार ते पाच दिवस वयोगटातील असल्याचा अंदाज वनविभागाचा आहे. या बछड्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी अनेकांना बछड्यासह "सेल्फी' घेण्याचा मोह आवरता आला नाही.
बिबट मादी एकाच बछड्यासह जंगलात गेल्यामुळे ती दुसऱ्या बछड्याला नेण्यासाठी केव्हाही येऊ शकते, असा अंदाज होता. मात्र सायंकाळच्या वेळी नजीकच्या परिसरात एका बछड्याचा मृतदेह सापडला. हा त्याच बिबट मादीच्या बछड्याचा असावा, असा अंदाज आहे.

Web Title: yavatmal Female leopard news