शिक्षक दाम्पत्यासाठी गावकरी धावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : पुलावरून वाहणाऱ्या पुराचा अंदाज न आल्याने मोटारसायकल घसरून वाहत जाणाऱ्या शिक्षक दाम्पत्याला गावकऱ्यांनी वाचविले. ही घटना आज, मंगळवारी घडली.

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : पुलावरून वाहणाऱ्या पुराचा अंदाज न आल्याने मोटारसायकल घसरून वाहत जाणाऱ्या शिक्षक दाम्पत्याला गावकऱ्यांनी वाचविले. ही घटना आज, मंगळवारी घडली.
धनसळ येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक संजय बिडवई व त्यांच्या पत्नी धनश्री बिडवई सकाळी साडेदहाला शाळेत जाण्यासाठी धनसळ तांडा येथे पोहोचले. या दोन्ही गावांच्या मधून वाहणाऱ्या ओढ्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहात होते. सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे नेहमीपेक्षा जास्त पाणी पुलावरून वाहत होते. बिडवई यांनी दुचाकी पुलावरील पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याचा प्रवाह भरपूर असल्याने दुचाकी घसरून ते वाहून जाऊ लागले. ही घटना शेजारीच असलेल्या गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत दाम्पत्याला वाचविले. शिक्षक दाम्पत्य किरकोळ जखमी झाले आहेत.

अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाकडे पुलाची उंची वाढविण्याची मागणी धनसळ येथील ग्रामपंचायतने केली आहे. कमी उंचीच्या पुलामुळे गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गरोदर महिला, रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे.
मनीषा नाईक

सरपंच, धनसळ.

Web Title: yavatmal flood news