Yavatmal Accident : यवतमाळमध्ये कार-बसचा भीषण अपघात! चौघे जागीच ठार, १३ गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal horrific accident in st bus and car in 4 dead 13 injured  marathi news

Yavatmal Accident : यवतमाळमध्ये कार-बसचा भीषण अपघात! चौघे जागीच ठार, १३ गंभीर जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहरालगट एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. कार अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की या कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. तर समोरून येणाऱ्या बसमधील १३ जण गंभीर जखमी झालेत.

यवतमाळकडून अमरावतीकडे कार जात असताना अमरावतीवरून यवतमाळकडे येत असलेल्‍या एसटी बसचा भीषण अपघात झाला. त्यात चार जण जागीच ठार झाले. तर बसमधील तेरा जण गंभीर जखमी झाले. या घटनेत राजेश इंगोले, रजनी इंगोले (रा. यवतमाळ), वैष्णवी गावंडे (रा. वाशिम) आणि सारीखा चौधरी (रा. पुसद, यवतमाळ) असे कारमधील मृतकाचे नाव आहे.

घटना यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ घडली असून बसमधील तेरा जण गंभीर जखमी झाले. नेर येथील काही सामाजिक कार्याकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी रवाना केले.

टॅग्स :Yavatmal