दिलीप बिल्डकॉनला दोन कोटींचा दंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

महागाव (जि. यवतमाळ) : भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन कंपनीला अवैध उत्खनन केल्याप्रकरणी येथील तहसीलदारांनी दोन कोटी दहा लाख 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

महागाव (जि. यवतमाळ) : भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन कंपनीला अवैध उत्खनन केल्याप्रकरणी येथील तहसीलदारांनी दोन कोटी दहा लाख 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण सुरू आहे. हे काम दिलीप बिल्डकॉन कंपनी करीत आहे. भराव टाकण्यासाठी मुरुमाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. याबाबत "सकाळ'ने "महागावात अवैध उत्खनन' या मथळ्याखाली 31 जूनला बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल घेऊन महसूल प्रशासनाने दिलीप बिल्डकॉनला दंड ठोठावला. महसूल प्रशासनाने कंपनीला नोटीस बजावून खुलासा मागविला होता. त्यामध्ये कंपनीने 100 ब्रास मुरमाचे उत्खनन केल्याचे कबूल केले. त्यावर तहसीलदारांनी खडका शेत सर्व्हे 131 येथील खड्ड्यांचे मोजमाप करून उपअभियंता महागाव यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. उपअभियंत्यांनी आठ जुलैला दहा हजार 508 ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन झाल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. यावरून तहसीलदारांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीला सद्यस्थितीतील किंमतीच्या पाचपट म्हणजे दोन कोटी दहा लाख 16 हजार रुपये दंड आकारला आहे. दंड तत्काळ भरावा अन्यथा ही रक्कम जमीन महसूल थकबाकी म्हणून वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: yavatmal news