पुसद शहरात वाहनांची तोडफोड; 15 संशयितांना अटक; तलवारी जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुसद (जि. यवतमाळ) : शहरात गुरुवारी (ता. 29) रात्री काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफाड करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अनेक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी 15 संशयितांना अटक केली असून, या कारवाईत तलवारींसह काही शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकारानंतर पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : शहरात गुरुवारी (ता. 29) रात्री काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफाड करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अनेक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी 15 संशयितांना अटक केली असून, या कारवाईत तलवारींसह काही शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकारानंतर पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

शहर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या सुभाष वॉर्ड, नूर कॉलनी परिसरात गुरुवारी (ता. 29) रात्री नऊच्या दरम्यान किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आठ संशयितांना अटक केली. परंतु, दोन तासानंतर या वादाचे पडसाद वसंतनगर परिसरात उमटले. येथील काही तरुणांनी हातात लाठ्या-काठ्या व तलवारी घेऊन काही नागरिकांच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. वसंतनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मोठा ताफा रात्रभर शहरात तैनात होता.

समाजकंटकांनी रस्त्यावरील पालिकेच्या दिव्यांची प्रथम तोडफोड करून आपला मोर्चा वाहनांकडे वळविला. काही घरांवर दगडफेक करून दारे व खिडक्यांवर शस्त्रांनी वार करण्यात आले. यात एका घरासमोर उभ्या ऑटोचे मोठे नुकसान झाले, तर एका इंडिका वाहनाच्या मागील व समोरील बाजूच्या काचा फोडल्या. इतर अनेक दुचाकींचेही नुकसान केले. घटनेच्या दुसर्‍या दिवशी (शुक्रवारी) शहरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार शहरात तळ ठोकून आहेत. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत हातात काठ्या व शस्त्र घेऊन फिरणार्‍या अनेकांविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यापैकी सात संशयितांना दोन तलवारी व शस्त्रांसह अटक केली आहे.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Web Title: yavatmal news 15 areested for the Disruption of vehicles