व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचा चौकशी अहवाल पूर्वग्रहदूषित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

यवतमाळ : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आली, असा राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवलेला ठपका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.

हा अहवाल मनेका गांधी यांच्या दबावाखाली देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केली आहे. 2 नोव्हेंबरला असगर अली खान याने गोळी झाडून अवनीची शिकार केली. पण, मुळात असगर अलीची नियुक्ती या कामासाठी करण्यात आलीच नव्हती, असा अफलातून बिनबुडाच्या आरोपाचा शोध राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने लावला. समितीने राज्य सरकारकडे सोपविलेल्या अहवालात वनकायदा, शस्त्रकायदा आदींचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवताना वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचे अस्तित्व राज्य सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: yavatmal news