निसर्गाच्या प्रकोपाने क्षणात होत्याचे नव्हते झाले..

सचिन शिंदे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

आर्णी (यवतमाळ): शेतकऱ्यांच्या जीवनात नेहमी उपेक्षाच आहे. वर्षभर काबाडकष्ट करूनही शेवटी आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाची अवकृपा. शेतातील पीक घरी येईपर्यंत आपले आहे म्हणता येत नाही. कितीही मेहनत केली तरी निसर्ग का कोपला तर शेतकऱ्यांचे काहीच चालत नाही.

आर्णी तालुक्यातील साकुर, मुकींदपुर, कोसदनी, कवठाबाजार, अंबोडा, दोनवाडा, राणी धानोरा या गावात मंगळावारी (ता. 13) सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेतात डोलत असलेले चना, गहु, ज्वारी, भुईमुंग, तीळ, भाजीपाला, टरबुज, संत्रा, आंब्याचा बहर एका क्षणात जमीन दोस्त झाले. याचे कारणही तसेच होते. सहा वाजता सुसाट वारा वादळ सुरू झाला. वादळात मोठमोठी झाडे उन्मळून पडले, पशु-पक्षी मरून पडले. विजांचे खांब पडल्याने परिसरात लाईट रात्रभर नव्हती. घरावरील टिनपत्रे उडून गेले, अनेक घरे पडली. शेतातील एकही पीक उभे राहिले नाही. कारण आजपर्यंत च्या इतिहासातील सर्वात मोठी व भयानक गारपीट झाली झाली. त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते नुकसान कदी ही भरून निघणारे नाही.

शेतकऱ्यांनी वर्षेभर केलेली मेहनत एका क्षणात गारपिटीने जमिनदोस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. या पिकावर असलेली संपुर्ण शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. त्यांना शासकीय मदतीची गरज आहे.

Web Title: yavatmal news arni farmer rain agriculture