सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न फसला

राजकुमार भिटकट
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

  • गँगरेपचा प्रयत्न फैसला
  • ट्रॅफिक पोलिसांची कार्रवाई
  • 6 आरोपी फरार
  • मुली वडगाव रोड पोलिस स्टेशनला आहेत

यवतमाळ : मुलींना अडवून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा सहा युवकांचा प्रयत्न फसला. ही घटना सोमवारी (ता. २) सायंकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान दारव्हा मार्गावरील भोयर फटीजवल उघडकीस आली. 

दोन मुलींना रस्त्यात अडवून त्यांच्यावर अत्याचाराच्या बेतात असलेल्या युवकांना समोरून वाहतूक पोलिसांचे वाहन येताना दिसताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्या दोन मुलींना ताब्यात घेतले असून, त्यांना येथील वडगाव रोड पोलीस ठान्यात आणले.

दरम्यान, मुलींनी तक्रार करण्यास नकार दिल्याने त्यांना थांबवून ठेवण्यात आले. पोलिस त्या युवकांचा शोध घेत असून या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविण्यात आला नाही. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: yavatmal news attempt to gangrape