आर्णी तहसीलवर कॉंग्रेस संताप बैलबंडी मोर्चा...

सचिन शिंदे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी जन संताप मोर्चा

आर्णी : तालुक्यातील कॉंग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने (ता. 30 रोजी) तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी जन संताप मोर्चा काढण्यात आला.

कापसाला 7000 रुपये भाव द्यावा, उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, शेतकर्‍यांची सरसकट कर्ज माफ करावे, कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकरी शेतमजुरांच्या कुंंटुंबांना 10 लाख व जखमींना दोन लाख मदत देण्यात यावे, काळा पैसा परत आणून प्रत्येकाचा बँकेच्या खात्यात पैसे टाकावे, जी.एस.टी. प्रणाली सुटसुटीत करावी, यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या निवेदन तहसीलदार यांना  देण्यात आले.  

यावेळी  माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मनिष पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती येंडे, किरण मोघे, पंचायत समिती सभापती सुर्यकांत जयस्वाल, नगरपरिषदचे उपाध्यक्ष राजीव विरखडे, साजीद बेग, अनिल आडे, प्रदीप वानखडे, अतुल देशमुख, नितेश बुटले, राजु बुटले, विजय मोघे, आरिज बेग उपस्थित होते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: yavatmal news congress protests with bullock carts at arni