'चाय पे चर्चा'ला चार वर्षे पूर्ण, दाभडी जैसे थे...

सचिन शिंदे
मंगळवार, 20 मार्च 2018

शेतकऱ्यांसाठी सरकारने काय करायला हवे असे तत्कालीन सरकार कसे निष्क्रिय आहे हे पटवून सांगितले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करायला हवे. देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तर काय करनार त्याच्या योजनांची मोठी यादीच नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली.

आर्णी : 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी येथे 20 मार्च 2014 रोजी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी लाईव्ह चर्चा केली होती. त्यावेळी तत्कालीन भारत सरकारवर जोरदार टीका करून हे सरकार शेतकरी विरोधी सरकार कसे आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारने काय करायला हवे असे तत्कालीन सरकार कसे निष्क्रिय आहे हे पटवून सांगितले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करायला हवे. देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तर काय करनार त्याच्या योजनांची मोठी यादीच नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली. त्यांच्या याच आश्वासनाला बळी पडुन शेतकऱ्यांनी देशात भारतीय जनता पक्षाकडे देशात व राज्यात सत्ता दिली.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान मंत्री झाले परंतु शेतकऱ्यांची परीस्थिती आहे तशिच आहे. आजही देशात शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात चालु आहे. नाशिकचा शेतकरी लॉंग मार्च तसेच महागाव तालुक्यातील चिलगव्हान येथिल शेतकरी साहेबराव करपे यांची सामुदायिक आत्महत्या यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपुर्ण राज्यात अन्नत्याग आंदोलनामुळे सरकार कसे शेतकरी हिताचे आहे हे लक्षात येते. 20 मार्च म्हणजे आर्णी तालुक्यातील अविस्मरणीय दिवस आहे. कारण याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा करून मोठ मोठे आश्वासन दिले होते त्याला आज चार वर्षे पूर्ण झाली आहे. परंतु दाभडी गाव व देशातील शेतकरी मात्र आहे तसाच आहे.

Web Title: Yavatmal news farmers agitaiton in arni