दारूचा साठा वाहून नेणारी शासकीय रुग्णवाहिका जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

संशयित ताब्यात; यवतमाळ पोलिसांची कारवाई
 

यवतमाळ :  नांदेड जिल्ह्यातील शासकीय (१०८) रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून येथील पांढरकवडा मार्गावर रुग्णवाहिका जप्त करीत संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (ता.29) पहाटेच्या सुमारास झाली.

गजानन मोहनलाल जयस्वाल (वय 39, रा. माहूर जि. नांदेड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो एमएच 14 सीएल 8222 या क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून दारू घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्या, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

त्यात देशी-विदेशी मिळून एकूण आठ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. बीट जमादार जगदीश किसन राठोड (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: yavatmal news liquor carrying ambulance seized