यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

आर्णी (जि. यवतमाळ) : एक अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आर्णी तालुक्‍यातील बोरगाव येथे शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक सोळा वर्षांची मतिमंद मुलगी घरी एकटीच होती. हे पाहून आरोपी चरण दुलसिंग चव्हाण (वय 30) याने तिच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारच्या घरातील एक महिला धावत आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणाची आर्णी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: yavatmal news marathi news sakal news rape attempt