विमुक्त व भटक्या जातीजमाती वेलफेअर फेडरेशनच्या राज्याध्यक्षपदी माया शेरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

राज्य उपाध्यक्षपदी अभियंता प्रज्ञा नरवाडे यांची नियुक्ती

यवतमाळ : अखिल भारतीय विमुक्त व भटक्या जातीजमाती वेलफेअर फेडरेशनच्या राज्याध्यक्षपदी (महाराष्ट्र राज्य) माया शेरे यांची, तर राज्य उपाध्यक्षपदी अभियंता प्रज्ञा नरवाडे यांची नियुक्ती झाली आहे. विमुक्त व भटक्या जातीजमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन दिल्ली येथील बैठकीत गौरविण्यात आले.

विमुक्त व भटक्या जातीजमाती फेडरेशनच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक दिल्ली येथील कनॉट प्लेस नार्थन युनियन रेल्वे कॉमेन्स कार्यालयात मंगळवारी (ता. 19) पार पडली. अध्यक्षस्थानी विमुक्त व भटक्या जातीजमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते होते. बैठकीला 14 राज्यातील अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महिला विंग्जच्या राज्याध्यक्षपदी (महाराष्ट्र राज्य) ‘सकाळ’च्या तनिष्का सदस्य माया शेरे व राज्य उपाध्यक्षपदी भारत गौरव पुरस्कारप्राप्त स्थापत्य अभियंता प्रज्ञा नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फेडरेशनकडून भटक्या व विमुक्त जातीजमातीचा सर्वांगीण विकास करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले जाणार आहे. या बैठकीला फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश नागर, चेअरमन सुखदेवसिंग सुधंवालिया, संयोजक वीरेंद्र रत्ने, महासचिव पवन सागर, राष्ट्रीय संरक्षक वाहिनीच्या पूजा ठाकूर, राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे अध्यक्ष युद्धबीर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कल्पना जोशी, अमृत मेडेकर, बंजारा टायगरचे आत्माराम जाधव आदींची उपस्थिती होती. लवकरच फेडरेशनचे राष्ट्रीयस्तरावरील अधिवेशन होणार असून त्यात पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती माया शेरे यांनी ’सकाळ’ला दिली.

Web Title: yavatmal news Maya Shere as the head of Welfare Federation