यवतमाळ: कीटकनाशक विषबाधेचा 20 वा बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच सरपंच व पोलिस पाटील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी यवतमाळ येथे निघाले असून या वृत्ताने गावात शोककळा पसरल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची विषबाधा झाल्याने शुक्रवारी रात्री आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील बळींची संख्या वीसवर पोहोचली आहे. गजानन हनमंतू नैताम (वय ४०) असे मृताचे नाव असून तो झारीजामणी तालुक्यातील माथर्जुन येथील रहिवाशी आहे.

सदर शेतकरी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी कपाशिवर कीटकनाशक फवारणीसाठी गेला होता. रात्री घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर पडल्याने डॉक्टरांनी त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच सरपंच व पोलिस पाटील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी यवतमाळ येथे निघाले असून या वृत्ताने गावात शोककळा पसरल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली.

Web Title: Yavatmal news one more farmer dead in yavatmal