यवतमाळ: मुसळधार पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची सुटका

राजकुमार भितकर
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

गेल्या २० वर्षात प्रथमच एका तासात अशा प्रकराचा मुसळधार पाऊस पडला. वाऱ्यामुळे झाड पडल्याने नेर ते मंगलादेवी रस्ता बंद झाला. या मार्गावरील सर्व वाहतूक नेरमार्गे परत वळविण्यात आली. तर, नेर ते बाभूळगाव बसमधील प्रवाशांना गावकऱ्यांनी आश्रय दिला.

यवतमाळ : नेर तालुक्यातील मंगलादेवी येथे शनिवारी रात्री आठ ते साडेनऊ दरम्यान मुसळधार पाऊस पडला. विजेचा कडकडाट प्रचंड होता. रस्त्यावर दोन्ही बाजूने बाभुडीची झाडे पडली. यात नेर ते बाभूळगाव रात्री शेवटची बस अडकली. त्यातील सर्व प्रवाशांना बाहेर काढून सुखरूप त्यांच्या गावाला पोहोचविण्याचे काम गावातील तरुणांनी केली. 

योगेश दहेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षात प्रथमच एका तासात अशा प्रकराचा मुसळधार पाऊस पडला. वाऱ्यामुळे झाड पडल्याने नेर ते मंगलादेवी रस्ता बंद झाला. या मार्गावरील सर्व वाहतूक नेरमार्गे परत वळविण्यात आली. तर, नेर ते बाभूळगाव बसमधील प्रवाशांना गावकऱ्यांनी आश्रय दिला. शेजारच्या गावातील प्रवाशांना दुचाकीने तरुणांनी त्यांच्या गावाला नेऊन सोडले. यात मोठया प्रमाणात पिकाचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

तर, बसमधील प्रवाशांना दिलासा दिल्याने चालक आसिफ खान व वाहक उमेश लोहकरे यानी मदतीस धावून आलेल्या तरुणाचे आभार मानले.

Web Title: Yavatmal news rain in ner