उमरखेडमध्ये तणावपुर्ण शांतता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सदर घटना निषेधार्थ असून ज्यांनी ज्यांनी आक्षेपार्ह मजकूर पाठवले व ज्यांनी शहरातील शांतता बिघडवली आहे त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन   उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकूमार बंसल यांनी केले आहे .

दोन चार चाकी व एका दुचाकी चे अज्ञातांकडून वाहनाचे नुकसान

उमरखेड (यवतमाळ) सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने शहरात दोन चार चाकी व एका दुचाकी वाहनासह घरावर दगड फेक झाल्याने शहरात तणावपुर्ण शांतता पसरली आहे.

काल मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली. काही समाज कंटकांनी सोशल मीडियावर (वॉटसअॅप) आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने समाज बांधवांनी रात्री उशीरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन २६ जुन च्या रात्रीच मजकूर टाकणा-या इसमास ठाण्यात आणुन पोलिस कारवाई केली होती. आज (मंगळवार) दुपारी ३;३० च्या दरम्यान ढाणकी रोडवर एका समुहाने स्कार्पिओ वाहन क्र. एमएच २६ एके ५८६४ ला टारगेट करत वाहनाची तोडफोड करत वाहन पलटी केले. दुसरी घटना हुतात्मा चौकातील स्वामी च्या मठाजवळ घडली. येथे उभ्या असलेल्या ह्युन्डाई वाहन क्र.  एमएच २९ एआर ४१९७ सह एका मोटर सायकल आणि घराच्या दरवाजा वर दगडफेक केली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटना घडताच शहरातील बाजार पेठ नागरीकांनी बंद केली होती. वेळेवरच पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. यावेळी वरुणराजाचे आगमन झाल्याने शहरात शुकशुकाट पसरला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, शहरात तणाव पुर्ण शांतता आहे . दरम्यान उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकूमार बंसल, तहसीलदार भगवान कांबळे पोलिस स्टेशनला तळ ठोकून होते.  

पोलिस कार्यवाही करीत असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे सारनाथ रोकडे (मुद्रांक विक्रेते) आणि नागापूर रुपाळा येथील पोलिस पाटील सदानंद तोंडसे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकूमार बंसल यांनी दिली.  नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Web Title: yavatmal news umarkhed and social media