बनावट नोटा बाजारात चालवणाऱ्या युवकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

येथील गोचरस्वामी वार्डातील एका किराणा दुकानातून शंभर रुपयांची बनावट नोट देऊन व्यवहार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह अटक केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

उमरखेड (जि. यवतमाळ) : येथील गोचरस्वामी वार्डातील एका किराणा दुकानातून शंभर रुपयांची बनावट नोट देऊन व्यवहार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह अटक केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हिंगोली येथील आरोपी नवीदोद्दीन नुरोद्दीन फारुकी हा तरुण शंभर रुपयांच्या बनावट नोटा घेऊन उमरखेड शहरात व्यवहार करत होता. गोचरस्वामी वार्डातील एका किराणा दुकानात खरेदी करत असताना शंभर रुपयांची नोट बनावट असल्याचा दुकानदारास संशय आला. त्यानंतर या परिसरातील जागरुक युवक गजानन डहाळे, प्रदीप बाभूळकर यांनी एकत्र येऊन फारुकीला पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक सारख्या नंबरच्या बारा व एकाच नंबरच्या 19 नोटा सापडल्या . त्यानंतर सदर दुकान दाराच्या व्यवहारात आढळलेली एक नोट अशा एकूण 32 नोटा ताब्यात घेऊन फिर्यादी गजानन डहाळे यांच्या रिपोर्टवरून आरोपी विरोधात 489 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी सदाशिव भडीकर सपोनी विजय चव्हाण करत आहेत.

Web Title: yavatmal news umerkhed news hingoli news marathi news fraud