यवतमाळ शहरावर अंधाराचे सावट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पथदिव्यांचे तीन कोटी थकीत; महाविरतरणच्या नोटीसची मुदत संपली

यवतमाळ : कृषिपपानंतर वीज महावितरण कंपनीने पथदिव्यांच्या थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतलेली आहे. यवतमाळ नगरपालिकेकडे पथदिव्यांचे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीज महावितरण कंपनीने 23 फेब्रुवारीला दिलेल्या नोटीसची मुदत आज (मंगळवार) संपली. त्यामुळे शहरातील पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित होऊन शहरावर अंधाराचे सावट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका, पालिका, नगरपंचायत, ग्रामपंचयातीकडे महावितरणची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम मागील काही महिन्यांपासून सुरू केलेली आहे. यंदा शेतकर्‍यांवर संकट असल्याने सध्यातरी कृषिपंपांची वसुली वीज महावितरण कंपनीने थांबविली आहे. मात्र, पथदिवे टार्गेट करण्यात आलेली आहेत. काही दिवसांपूर्वी कळंब नगरपंचायतीच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर यवतमाळ नगरपालिकेला महावितरण कंपनीने गेल्या 23 फेब्रुवारीला थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावलेली होती. मात्र, अजूनही नगरपालिकेने थकबाकी भरलेली नाही. परिणामी, कधीही नगरपालिकेच्या पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास शहरातील रस्त्यांवर होणारा झगमगाट अंधारात परिवर्तीत होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

महावितरणकडून तयारी पूर्ण
महावितरणकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे वीजपुरवठा शहरातील पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी महावितरण कंपनीकडून पूर्ण झालेली आहे. दरम्यान, उद्या बुधवारी (ता.21) नगरपालिकेच्या पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

Web Title: yavatmal news yavalmal city light mahavitaran