यवतमाळ : वाघाने नेले फरफटत; मित्र मदतीसाठी धावल्याने वाचला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger attack

यवतमाळ : वाघाने नेले फरफटत; मित्र मदतीसाठी धावल्याने वाचला जीव

पोंभुर्णा (जि. यवतमाळ) : कामावरून परत जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी २ वाजता चिंतामणी महाविद्यालयाजवळ घडली. राहुल गणपत चव्हाण (वय ३०, रा. चनकापूर वणी) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा वाघाने युवकावर हल्ला करून जखमी केले. यामुळे नागरिकांत भीती पसरली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चव्हाण कुटुंबीयाने उदरनिर्वाहासाठी पोंभुर्णा शहरात वास्तव्यास आहेत. ते गॅस दुरुस्तीचे काम करतात. गुरुवारी सकाळी राहुल आपल्या कामावर गेला होता. तिथून परत येत असताना तो स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ आपल्या सहकाऱ्याची वाट बघण्यासाठी थांबला. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

फरफटत जंगलाच्या दिशेने नेत असताना राहुलचे दोन सहकारी तिथे आले. त्यांनी लाठ्याकाठ्यांनी वाघाला परतवून लावले. राहुलला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. जखमा जास्त असल्याने पुढील उपचारासाठी राहुलला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. सध्या या परिसरात वनविभागाची गस्त सुरू आहे.

loading image
go to top