Crime
Crime

सीनिअर विक्री प्रकरणात यवतमाळच्या तरुणास अटक

यवतमाळ - देशात गाजत असलेल्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स (सीनिअर) विक्री प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने यवतमाळच्या तरुणास पुण्यातून अटक केली. यातील महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना यवतमाळ पोलिस अधीक्षकांचा कार्यालयीन ई-मेल आयडी आणि पासपोर्ट पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अंजिक्‍य काशिनाथ नागरगोजे (वय 25, रा. मोठे वडगाव) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

ठाणे येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक एकच्या पथकाने गोपनीय माहितीवरून गेल्या पंधरवड्यात कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीनिअर) विकणाऱ्या देशांतर्गत टोळी उघडकीस आणली होती. या प्रकरणी देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह सात जणांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध आयटी ऍक्‍ट, आयपीसी व टेलिग्राफ ऍक्‍टनुसार गुन्हे नोंदविले आहेत. त्याने दिलेल्या माहितीवरून टोळीत सहभागी आणखी दोन संशयितांना पुण्यातून अटक केली. त्यात यवतमाळच्या अजिंक्‍य नागरगोजेचा सहभाग असून, त्याने जिल्हा पोलिस दलात खासगी सेवा दिल्याची माहिती आहे. चार वर्षांपूर्वी नागरगोजेला यवतमाळच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी पोलिस दलाचे "पोर्टल'चे काम दिल्याची माहिती आहे. अंजिक्‍यचे सायबर विषयातील ज्ञान पाहून त्याची आव्हानात्मक गुन्हाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनीही मदत घेतली आहे. त्याने केलेल्या मदतीने अंजिक्‍यने स्थानिक सायबर क्राइम विभागातील अधिकाऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. नेमका त्याचा फायदा घेत त्याने येथील अधीक्षकांच्या कार्यालयीन "ई मेल' आयडी आणि पासवर्ड चोरला. त्याद्वारे गुप्तहेर रजनी पंडित यांच्याशी संगनमत करून त्याने अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन तपशील म्हणजे (सीनिअर) काढले. तसेच त्यांची विक्री केल्याची खळबळजनक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पुण्यातून केली अटक
सुमारे वर्षभरापूर्वी अंजिक्‍य नोकरीनिमित्त पुणे येथे गेला. दरम्यान, तो पुण्यात असल्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी पुण्यात जाऊन अंजिक्‍य आणि टोळीतील सदस्य असलेल्या त्याचा अन्य एक साथीदार जसप्रीतसिंग भूपेंद्रसिंह मारवा (वय 32, रा. मुंब्रा) या दोघांना अटक केली. जसप्रीतसिंग हा एका मोबाईल कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com