मर्दानींनी केला 'मर्दानी' संकल्प, वाचा कोणता?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी या वर्षात दैनंदिन कामकाज, गणपती, दुर्गादेवी, दिवाळी, मान्यवरांचा दौरा, लोकसभा, विधानसभा निवडणूक या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे या कालावधीत कोणतीही अनूचित घटना घडली नाही

यवतमाळ : बंदोबस्त आणि पोलिस यांचे नाते तसे जुनेच. उन्हाळा, पावसाळा असो किंवा हिवाळा पोलिसांना बंदोबस्तात राहावेच लागते. दिवाळी, होळी, पोळा, अविवेशन असो किंवा अन्य कोणता मोठा कार्यक्रम पोलिसांशिवाय काहीही शक्‍य नाही. कोणत्याही सणाला त्यांनी सुट्टीही मिळत नाही. सहाजिकच पुरुष असो अथवा महिला त्यांच्यावर कामाचा ताण हा येतोच. महिला कर्मचाऱ्यांवर घरचीही जबाबदारी असते. दैनंदिन कामकाजाच्या व्यस्ततेतून ताण कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलिस दलातील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना "मर्दानी'ची सरप्राईज दिली. सर्वांनी मिळून हा चित्रपट बघितला आणि महिला अत्याचाराला आळा घालण्याचा संकल्प केला. 

महत्त्वाची बातमी - शेतकऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट; दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी

जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी या वर्षात दैनंदिन कामकाज, गणपती, दुर्गादेवी, दिवाळी, मान्यवरांचा दौरा, लोकसभा, विधानसभा निवडणूक या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे या कालावधीत कोणतीही अनूचित घटना घडली नाही. त्यांच्या या कार्याचे पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले. महिला अत्याचाराच्या घटना कशा रोखता येईल यासाठी शनिवारी (ता. 21) सकाळी पोलिस मुख्यालयातील प्रांगणात "महिला व बाल संरक्षण' या विषयावर कार्यशाळा घेतली. यावेळी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या अडचणींची माहिती जाणून घेण्यात आली. 

विशेष बातमी - अध्यक्ष महोदय, मी घोटाळा केला नाही

कार्यशाळा संपत असताना पोलिस अधीक्षकांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक सरप्राइज दिले. थेट मर्दानी चित्रपट दाखविण्यासाठी घेऊन गेले. कारण, हा चित्रपट महिला पोलिसवर आधारित आहे. यात राणी मुखर्जीने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग आलेला आहे. महिला पोलिस कशी असवी, तिने कसे काम करावे, महिला व त्यांच्या रक्षणासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्याची तयारी ठेवावी, यावर हा चित्रपट आधारित आहे. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing, shoes and outdoor
महिला पोलिसांचे स्वागत करताना

यावेळी रम्या एम. राजकुमार, मिनाक्षी प्रदीप शिरस्कर यांनी चित्रपट गृहात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वांनी मिळून चित्रपट बघितला. "उखाड फेका हर दुश्‍मन कों, जिसने औरत का अपमान किया, मर्दानी की परिभाषा बनकर, आजादी का पैगाम दिया' या उक्तीप्रमाणे कार्यशील होण्याचा संदेश दिला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

कुणाला सुचली कल्पना?

रम्या एम. राजकुमार या मानसशास्त्रज्ञ व सल्लागार (सॉफ्टस्किल ट्रेनर) आहेत. पतीच पोलिस अधीक्षक असल्याने पोलिस खात्यातील ताण व तणावांबाबत त्यांना कल्पना आहे. ताण घालवणे व महिला सशक्तीकरणाबाबत प्रभावी जागृती व्हावी, अशी कल्पना रम्या यांना सुचली. त्यानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी "मर्दानी'ची सरप्राईज दिली. 

 

Image may contain: 17 people, people standing, crowd, wedding and outdoor
पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार

प्रत्यक्ष सहभाग घ्या
काम करीत असताना स्वत:ला कमजोर समजू नका. प्रत्यक्ष गुन्हे तपास व गुन्हे प्रगटीकरण यात भाग घेऊन महिलांविरुद्घ होणाऱ्या अत्याचाराला आळा कसा बसेल, या दृष्टीने महिला अधिकाऱ्यांनी अधिक सशक्त व्हावे. 
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal women police watched a mardaani movie