यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पावसाच्या स्थितीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी (ता. 15) रात्री पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने आर्णी, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील 700 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख स्वतः लक्ष ठेऊन आहेत. काल (ता. 16) रात्री 8.30 ते 10.30 आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून या तीन तालुक्यासह जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला.

बुधवारी (ता. 15) रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार आजही सुरू होती. पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आभाळा कडे होत्या. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असला तरी काही तालुक्यात कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिग्रस, आर्णी व उमरखेड तालुक्यात कमी वेळेत जास्त पाऊस कोसळला. परिणामी नदी नाल्याना पूर आला. त्यात नदी, गेल्या कालच्या गावात पाणी शिरले. तिन्ही तालुक्यातील जवळपास 700 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. .

पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज (ता.16) रात्री नियंत्रण कक्षात बसून महसुल, तहसील, उपविभागीय कार्यालय, महावितरण, पाटबंधारे विभाग आदी महत्त्वाच्या विभागाशी संपर्क साधला. कॅम्प मध्ये असलेल्या नागरिकाचे जेवण, त्यांच्या व्यवस्थेची विचारपूस करीत पंचनामाचे आदेश दिले .

Web Title: yawatmal collector visits disaster management department for heavy rain