...तर तिन्ही बाजूंनी चीनचे आक्रमण - मेजर गौरव आर्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नागपूर - ‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरच्या बाबतीत भारताने सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे २०४८ पर्यंत आपण तिन्ही बाजूंनी चिनी लोकांनी वेढले राहू, असा धोक्‍याचा इशारा माजी मेजर गौरव आर्य यांनी मनी बी इन्स्टिट्यूट व सोमलवार शाळेच्या ‘ये धरती ही बलिदान की’ कार्यक्रमात दिला. 

‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (एफपीसीसीआई) या संघटनेच्या अहवालानुसार २०४८ पर्यंत बलुचिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरद्वारे चीनची लोकसंख्या बलुची लोकांहून जास्त होईल. याचा अर्थ भारत तिन्ही बाजूंनी चिनी लोकांनी घेरलेला राहील. पाकिस्तानपेक्षा चीनची सेना व आंतरराष्ट्रीय प्रभाव जास्त आहे. त्यामुळे भारतीय सीमांना धोका आहे.

यावर राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय विचार आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य हेच उपाय आहे. चीनला आर्थिक मदत कमी होण्याकरिता भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करणे गरजेचे आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवानी दाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम यावेळी घेतला. शिवशाहीर डॉ सुमंत टेकाडे ह्यांनी आपल्या अनोख्या शैलीत शिव स्तुती गीतांना निवेदन दिले . कार्यक्रमाची संकल्पना आशिष घाटे व आशुतोष वखरे यांची असून मुकुल पांडे, मोनिका देशमुख, राधिका कपले- पिम्पूटकर, आशिष घाटे, विजय खडसे ह्यांनी गीत प्रस्तुत केले. वाद्यवृंदवर  श्रीकांत पिसे, राजा ाठोड, निशिकांत देशमुख, योगेश हिवराळे, प्रमोद बावणे, पंकज यादव आणि आशिष घाटे ह्यांनी साथ दिली. कार्यक्रमात  कर्नल सुनील देशपांडे, कॅप्टन वखरे, बी.के. सोमलवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: ye dharati hi balidan ki event