राज्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन तूर्त स्थगित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

सोमवारपासून कामकाज होणार सुरळीत
अकोला - राज्यात नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करीत असलेल्या ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने संघटनेने शनिवारपासून (ता. तीन) तीन महिन्यांसाठी आंदोलन स्थगित केले आहे. यामुळे सोमवारपासून (ता. पाच) राज्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे.

कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करणे, ग्रामसेवकांवरील कारवाई मागे घेणे, प्रवास भत्ता वेतनासोबतच देणे, शैक्षणिक अर्हता पदवीधर करणे, लोकसंख्येवर आधारित ग्रामसेवकांची पदनिर्मिती करणे, ग्रामसभेची संख्या मर्यादित करणे, इतर यंत्रणांच्या सभेसाठी सचिवामध्येही बदल करणे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांच्या संघटनेने नोव्हेंबरपासून राज्यात कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर सचिव व मंत्रीस्तरावर दोनदा बैठका झाल्या. अखेरीस शनिवारी यावर तोडगा निघाला.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून राज्यातील ग्रामसेवकांच्या प्रश्नांबाबत आश्वासन दिले; तसेच संघटनेला इतिवृत्त देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी पत्रक काढून ग्रामसेवक शनिवारपासून रुजू होत असल्याचे मंत्र्यांना कळविले आहे.

बैठकीतील निर्णय
. सेवाकाळाबाबतची नस्ती थेट सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्याकडे पाठवावी.
. ग्रामसेवकांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई म्हणून शिक्षेचे आदेश बजावले आहेत. ते मान्य नसल्यास विभागीय आयुक्तांकडे अपील करावे.
. रिक्त पदभरती व पदोन्नतीचा विचार
. वैद्यकीय कॅशलेस सुविधेबाबत विमा कंपनीशी चर्चा सुरू आहे.
. सेवाविषयक अडचणी तत्काळ सोडवाव्यात.

Web Title: Yet the state of suspension movement gram sevak