‘यिन समर यूथ समिट’ १२, १३ जूनला

Yin
Yin

नागपूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ’यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) व्यासपीठाने ’यिन समर यूथ समिट’ आयोजित केली आहे. नागपुरात १२ व १३ जून रोजी समिट होणार आहे. बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यात सहभाग नोंदविता येईल.

उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करून ऊर्जा देण्यासाठी व तरुणांनी स्वतःचा शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकास करताना देशाच्या जडणघडणीलाही हातभार लावावा, या हेतूने ‘समर यूथ समिट’चे आयोजन केले आहे. 

तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी ‘यिन’ राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे. गेल्या चार वर्षांपासून ‘यिन’ने ‘समिट’चे आयोजन केले जाते. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येकाला समिटचे किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रिटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग आणि सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्टअप ः द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअरविषयी मार्गदर्शन, प्रेझेंटेशन स्किल्स अशा विविध विषयांवर विविध सत्रे होतील. यात देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यातून प्रत्येकाला नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे. चला तर मग, आजच नोंदणी करा..!

रचनात्मक कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव 
विविध क्षेत्रांत उत्तम काम करणाऱ्या युवकांचा गौरव व्हावा, त्यांचे कौतुक व्हावे, अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी, या हेतूने रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचा यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड-२०१९ ने गौरव करण्यात येणार आहे. १८ ते ३० वयोगटातील युवक-युवती या पुरस्कारासाठी ८ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक कामगिरी, वैयक्तिक यश आणि इतर विशेष कामगिरी या संदर्भातील माहिती, बातम्यांचे कात्रण, आधी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती व छायाचित्रे आदींसह ‘यिन’ समन्वयकांशी किंवा नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयाशी संपर्क साधावा. कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप आणि उद्योग-स्टार्ट अप क्षेत्रासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

सहभागासाठी...
निवास व्यवस्थेबरोबरच डायरी, आयकार्ड, जेवण आदी सुविधा सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 
  कार्यक्रम स्थळ - कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर.
  वेळ - पहिला दिवस  - १२ जून ः सकाळी ९ ते रात्री ८
  दुसरा दिवस - १३ जून - सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत
  सहभागासाठी संपर्क - अमोल कडुकर मो. ९२७०१३१५८०

आजचा युवक मुळातच बुद्धिमान आहे. मात्र, त्याच्यापुढे आव्हानेही मोठी असून स्पर्धेलाही तोंड द्यावे लागत असले तरी विविध क्षेत्रांत संधीही आहेत. ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने तरुणांना उत्तम मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. संधीचा उपयोग सकारात्मकरीत्या कसा करावा, या दृष्टीने हे समिट तरुणांसाठी उपयुक्त ठरेल. 
- डॉ. रामनाथ सोनवणे, सीईओ, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड. 

‘यिन समर यूथ समिट’ नागपूरकर तरुणांसाठी पर्वणी आहे. युवकांनी विविध कला, गुण, मूल्यवर्धित शिक्षण आदी गुणांचा व्यावसायिकरीत्या वापर करून आर्थिक उन्नती साधली पाहिजे. या सर्व बाबींचा विचार करता ‘यिन समर यूथ समिट’च्या माध्यमातून नागपूरच्या तरुणांना नवा अनुभव मिळेल. 
- मोहन मते, माजी आमदार, अध्यक्ष, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com