सैराट थिरकली झिंगाट तरुणाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नागपूर - यिनच्या यूथ समिटच्या निमित्ताने पूर्व विदर्भातील युवक एकत्र आले. अल्पावधितच मैत्री फुलली. समारोपीय सोहळा पार पडला आणि निरोपाची वेळ आली. एकमेकांपासून दुरावण्यापूर्वी तरुणाईने गाण्यांच्या तालावर बेधुंद थिरकण्याचा आनंद लुटला.

तीन दिवस चाललेल्या समिटचा रविवारी समारोप झाला. समिटमध्ये सात जिल्ह्यांतील साडेतीनशेवर युवक, युवती सहभागी झाले होते. जीवनाचे स्वप्न या समिटमधून मिळाले. परंतु, मित्रांपासून दुरावण्याचा क्षण येताच मनात घालमेलही सुरू होती. समिटने सकारात्मक विचार दिला. विलग होण्याचे दु:ख मानण्यापेक्षा एकमेकांचे मित्र झालो. हा भाव विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा मानला. एकमेकांचे हातात हात घेत तरुणाईने गाण्यांवर थिरकत जल्लोष केला.

त्यानंतर मित्रांनी एकदुसऱ्यांना निरोप दिला. निरोप देताना मात्र सर्वांचेच डोळे पाणावले होते. समिटच्या तसेच मित्रांच्या आठवणी कायम राहाव्या यासाठी अनेकांनी सेल्फी काढून घेतल्या. मोबाईल क्रमांकांचे यापूर्वीच आदानप्रदान झाले होते. नेहमी फोनवर बोलण्यासह पुन्हा भेटण्याची ही ग्वाही देत तरुणाईने निरोप घेतला. हा हळवा क्षणही अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला. काही बस-ट्रॅव्हल्सने निघाले, तर काही रेल्वेने. रेल्वे स्टेशनवरही त्यांनी आनंद लुटत सेल्फी काढली.

Web Title: YIN Summer Youth Summit send up dance