‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नागपूर - मी ज्या शाखेत शिकतो आहे, त्या शाखेपलीकडे कुठलेही जग नाही. असाच विचार बहुतांश तरुण करतात. मात्र, जगात शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यासाठी ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करण्याची गरज आहे.

करिअरसाठीसुद्धा अनेक संधी चालून येतात. त्याकरिता सकारात्मक विचाराने पुढे जा, असे आवाहन डिजिटल आर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पार्गे आणि डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ द्रुपद मिस्त्री यांनी केले.

नागपूर - मी ज्या शाखेत शिकतो आहे, त्या शाखेपलीकडे कुठलेही जग नाही. असाच विचार बहुतांश तरुण करतात. मात्र, जगात शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यासाठी ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करण्याची गरज आहे.

करिअरसाठीसुद्धा अनेक संधी चालून येतात. त्याकरिता सकारात्मक विचाराने पुढे जा, असे आवाहन डिजिटल आर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पार्गे आणि डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ द्रुपद मिस्त्री यांनी केले.

‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या ‘यिन फेस्ट’ व्यासपीठअंर्तगत केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित  ‘यिन टॉक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात अजय पार्गे आणि द्रुपद मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. पी. सिंग, उपप्राचार्य डॉ. अविनाश बदर, डॉ. जयस्वाल, ‘यिन’चे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी, प्रा. संजय मालोदे उपस्थित होते.  महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. डी. पी. सिंग यांनी अजय पार्गे आणि द्रुपद मिस्त्री यांचा शाल, स्मृतिचिन्ह देत सत्कार केला. यिनचे चीफ मॅनेजर यांनी यिनची भूमिका आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना वेगळ्या विषयांची माहिती दिली. युवकांमध्ये नव्या संकल्पना रुजविण्यासाठी तयार केलेल्या ‘यिन टॉक’ व्यासपीठ बरेच मार्गदर्शक ठरणार असल्याचे ते म्हणाले. संचालन श्‍यामल देशमुख यांनी केले. आभार तेजस गुजराती मानले.

 ‘सकाळ’ने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नव्या जगाचा वेध घेण्याच्या दृष्टीने सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ आणि ‘डिझाइन ॲण्ड म्युझिक’ यासारख्या नावीन्यपूर्ण संकल्पनातून करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. मुळात ही बाब खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये वेगळा विचार करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 
- डॉ. डी. पी. सिंग, प्राचार्य, केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय.

‘व्हर्च्युअल रिॲलिटी’कडे बघा
अजय पार्गे म्हणाले, करिअरसाठी एक उत्कृष्ट संधी म्हणून डिजिटल युगात ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्यामधील कल्पतेचा वापर करून अनेक ‘स्टार्टअप’ निर्माण करता येणे शक्‍य आहे. भारतात यातून बऱ्याच प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. केवळ सकारात्मकतेने समोर जाण्याची तयारी तरुणांनी दर्शवावी. वेगळ्या संकल्पना आणि विचार करावा. या वेळी ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’मध्ये होत असलेल्या बदलांची माहिती देऊन पार्गे यांनी जागतिक स्तरावर त्यासंदर्भात सुरू असलेल्या संशोधन सुरू असल्याचे सांगितले.

डिझाइन सर्वांत महत्त्वाची 
डिझाईन क्षेत्रात विविध उद्योगांसाठी ॲप्लिकेशन्स तयार करून देणारे द्रुपद मिस्त्री यांनी संगीत आणि डिझाइन यांच्यातील संबंध अत्यंत मार्मिकपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. संगीत सुरू असताना, त्यातून कसे डिझाइन तयार करता येईल, यासाठी नेमके काय करावे? याबद्दल माहिती दिली. एखादी गोष्ट करायची ठरविल्यास ती पूर्ण करण्यासाठी स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले. विविध डिझाईन तयार करताना आलेले अनुभव विशद केले. या वेळी द्रुपद मिस्त्री यांनी सादर केलेल्या कर्णप्रिय ‘सरोद’ वादनाने विद्यार्थ्यांची दाद मिळविली.

Web Title: YIN Talk YIN Fest