सैन्यातील जवानाने विष घेतले, पत्नीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

अमरावती : सैन्य दलातील एका जवानाने पत्नीसह विषारी औषध घेतले. या घटनेत जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला तर जवानाची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक वरुणनगर, शीतला विहार महादेवखोरी येथे मंगळवारी (ता. 27) सकाळी ही घटना घडली.

चंदा देवेंद्र भालचक्र (वय 40), असे मृताचे तर देवेंद्र नाना भालचक्र (वय 36), असे अत्यावस्त व्यक्तीचे नाव आहे. देवेंद्र हा सैन्यदलात डेहराडून येथे कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यांना सात वर्षांचा एक मुलगा व अडीच वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी (ता.27) सकाळी पती-पत्नी घरात अत्यावस्त अवस्थेत आढळले. त्यांना नातेवाईक व नागरिकांनी 8.40 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. चंदा भालचक्र यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले, तर देवेंद्र भालचक्र याच्यावर कक्ष क्रमांक 10 मध्ये उपचार केले जात आहे. चंदाच्या मृत्यूप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दाम्पत्याने कोणत्या कारणावरून विष प्राशन केले, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the young army menTrooper poisoned wife's death