झरी जामणी तालुक्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal farmer

झरी जामणी तालुक्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरी जामणी : (जिल्हा यवतमाळ) : मुकूटबन येथून जवळच असलेल्या भेंडाळा (ता. झरी जामणी) येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना त्याच्या आईला शुक्रवारी (ता.१५) पहाटे पाच वाजता उघडकीस आली.

हेही वाचा: Live : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरूवात

याबाबत मुकूटबन पोलिसानी सांगितले की, घटनेची माहिती मृतकाच्या आईने मुकुटबन पोलिस दिली. गणेश रामदास खरवडे (वय ३५) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता तरुणाने स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. मृत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व आजोबा असा परिवार आहे.

हेही वाचा: बंगाल आणि पंजाबचे सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक - अमित शहा

या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माहितीवरून सहाय्यक फौजदार अनिल सकवान व जमादार दिलीप जाधव घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व प्रेत ग्रामीण रुग्णालय झरी जामणी येथे शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. दसरा सणाच्या दिवशी आत्महत्या केल्याने नातेवाईकांसह गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खाली अनिल सकवान व दिलीप जाधव करीत आहे.

loading image
go to top