नापिकीमुळे वडगावात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

 गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना एका तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली

राळेगाव (यवतमाळ)  - गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना एका तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. वडगाव येथे घडली. सततच्या नापिकीला कंटाळून त्याच्या वडिलांनीही काही वर्षांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.

श्रीजीत हाते (वय २४) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या नावे एक एकर शेती असून, मोठ्या भावाकडेही चार एकर शेती आहे. दोघेही संयुक्तरीत्या ही शेती करीत होते. गुढीपाडव्यालाच शेतीचे वर्षभराचे अर्थकारण सुरू होते. मराठी नववर्ष साजरे केले जाते. याचदिवशी सालगडी ठरविला जातो. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना श्रीजीत हाते या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी (ता.७) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविला.

Web Title: Young Farmer Suicides in yavatmal