चढणार होती बोहल्यावर, मात्र नियतीच्या मनात होते काही वेगळेच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

भंडारा, मौदा : नागपूर जिल्ह्यातील धानला येथील युवतीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील जाख शिवारात (ता. भंडारा) संशयास्पद स्थितीत आढळून आला. जिला बालपणी अंगाखांद्यावर खेळविले, हट्ट पुरविले व आता लवकरच जी लग्नाच्या बोहल्यावर चढणार होती, त्याच लाडक्‍या नातीचा मृतदेह समोर पाहून आजीला हृदयविकाराचा धक्‍का बसला व नातीच्या वियोगात तिचाही मृत्यू झाला. जुन्या प्रेमप्रकरणातून हा खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

भंडारा, मौदा : नागपूर जिल्ह्यातील धानला येथील युवतीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील जाख शिवारात (ता. भंडारा) संशयास्पद स्थितीत आढळून आला. जिला बालपणी अंगाखांद्यावर खेळविले, हट्ट पुरविले व आता लवकरच जी लग्नाच्या बोहल्यावर चढणार होती, त्याच लाडक्‍या नातीचा मृतदेह समोर पाहून आजीला हृदयविकाराचा धक्‍का बसला व नातीच्या वियोगात तिचाही मृत्यू झाला. जुन्या प्रेमप्रकरणातून हा खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मृत युवतीचे नाव अश्‍विनी भाऊराव ठोंबरे (वय 23) असे असून ती नागपूर जिल्ह्यातील धानला (ता. मौदा) येथील रहिवासी आहे. ती मौदा येथील भोयर महाविद्यालयात ती बीएस्सी अंतिम वर्षात शिकत होती. तिचे गेल्या महिन्यात कामठीजवळील भिलगाव येथील मुलासोबत लग्न जुळले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांचे धानला येथे साक्षगंध झाले, तर विवाह 4 फेब्रुवारीला होणार होता.

हेही वाचा - कधी थांबणार हे दुष्टचक्र? पुन्हा एक लाजिरवाणी घटना

भंडारा शहरापासून जवळच असलेल्या जाख/गुंजेपार या गावच्या आमराईत सोमवारी सायंकाळी एका अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत जाखचे पोलिस पाटील विठ्ठल वाघाडे यांनी भंडारा पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. मृत युवतीची ओळख पटविण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले असता, ती धानला (दहेगाव) येथील अश्‍विनी असल्याची ओळख पटली.

Image may contain: one or more people and outdoor
अश्विनीच्या घरासमोरील गर्दी

धानल्याच्या तरुणीचा भंडाऱ्यात संशयास्पद मृत्यू
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्‍विनीवर मारोडी पुनर्वसन येथील युवकाचे एकतर्फी प्रेम होते. त्याचा तिच्या लग्नाला विरोध होता. यातूनच तिचा खून करून मृतदेह जाख शिवारात टाकला असावा असा अंदाज आहे. भंडारा पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून आश्विन चव्हाण (वय 31) याला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय अधिक माहिती देऊ शकत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

क्लिक करा - Video : 'तो' बारमध्ये गेला अन्‌ बाहेर पडला, झाले असे अघटित...

आमदारांच्या घरासमोर मृतदेह
जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यावर नातेवाइकांनी मृतदेह धानला (दहेगाव) येथे आणला. त्यांनी तेथील आमदार टेकचंद सावरकर यांच्या घरासमोर मृतदेह ठेवून अश्‍विनीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यावरून आमदारांनी प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

मृतदेह पाहताच आजीचे निधन
अश्‍विनीचा मृतदेह मंगळवारी तिच्या धानला या गावी आणला असता तो पाहून आजी सीताबाई श्रावण ठोंबरे (वय 70) हिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातीच्या मृत्यूच्या दु:खवियोगाने आजीनेही जीव सोडला. यामुळे ठोंबरे कुटुंबीयांवर एकाच वेळी मुलगी व आई यांच्या मृत्यूचे दु:ख सहन करण्याची वेळ आली. दोन्ही मृतदेहांवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धानला येथे मौद्याचे ठाणेदार मधुकर गीते व पोलिस उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young girl body found in bhandara district