शस्त्र, काडतुसासह तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : घातपात करण्याच्या उद्देशाने जिवंत काडतुसासह अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता.15) येथील वसंतनगर परिसरात "एलसीबी'च्या पथकाने केली.

पुसद (जि. यवतमाळ) : घातपात करण्याच्या उद्देशाने जिवंत काडतुसासह अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता.15) येथील वसंतनगर परिसरात "एलसीबी'च्या पथकाने केली.
समीर खान असद खान (वय 25, रा. वसंतनगर) असे संशयिताचे नाव आहे. हा तरुण अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ वसंतनगर परिसरात सापळा रचला. जमजम हॉटेल मागील डांबरी रस्त्यावरून ताब्यात घेतले. अंगझडतीत 15 हजार रुपये किमतीचा देशी कट्टा, चार जिवंत काडतूस असा 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी त्याला वसंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man arrested with weapon, cartridge