चूलत भावाने भोसकल्याने तरुण मृत्युमुखी

प्रशांत शेटे 
सोमवार, 18 जून 2018

चाकूर (लातूर) - बोथीतांडा (ता.चाकूर) येथे किरकोळ कारणावरून सोमवारी (ता.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास चुलत भावाने सुनिल नामदेव जाधव (वय ३०) या तरूणाचा चाकूने भोसकून खून केला. 

चाकूर (लातूर) - बोथीतांडा (ता.चाकूर) येथे किरकोळ कारणावरून सोमवारी (ता.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास चुलत भावाने सुनिल नामदेव जाधव (वय ३०) या तरूणाचा चाकूने भोसकून खून केला. 

बोथीतांडा येथील सुनिल जाधव व सख्या चुलत भाऊ रामचंद्र शंकर जाधव यांच्या शेतीचा वाद होता, तसेच रविवारी (ता.१७) रात्री नातेवाईकाच्या विवाह समारंभाच्या कार्यक्रमात दोघांमध्ये वाद झाला होता. सोमवारी सकाळी पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोघात भांडण झाली. यावेळी रामचंद्र याने सुनिल याच्यावर चाकूने सपासप वार केले. पोटात सोळा वार झाल्यामुळे सुनिल जागीच मृत्युमुखी पडला. उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक रामचंद्र तट यांनी घटनास्थळी भेट दिली. सुनिल याचे प्रेत चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे, खून करून रामचंद्र हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Young man died due to stabbing him